Raanachya Paan

रानच्या पाखरा रे...
रानच्या पाखरा रे, उगीच भेट झाली
रानच्या पाखरा रे, उगीच भेट झाली
रानच्या पाखरा...

वहात होते पाणी, झऱ्यात धुंद गाणी
वहात होते पाणी, झऱ्यात धुंद गाणी

फुलात गंध होता, गंधात भेट झाली
रानच्या पाखरा...

प्रीतीची धुंद भाषा, लाविते गोड आशा
प्रीतीची धुंद भाषा, लाविते गोड आशा

मोकळ्या आभाळाची तुला रे, हाक आली
रानच्या पाखरा...

विरही उरे सुर, पाखरू गेले दूर
विरही उरे सुर, पाखरू गेले दूर

एकटी उभी येथे झुरत झाडाखाली
रानच्या पाखरा रे, उगीच भेट झाली
रानच्या पाखरा...



Credits
Writer(s): Mangesh Padgaokar, Vishwanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link