Tujasi Mee Pneet

तुजसी मी प्रीत, सख्या, आज करणार ना
तुजसी मी प्रीत, सख्या, आज करणार ना
मन माझे अदय, प्रिया, मुळी झुरणार ना

अनुदिन मोहित करुण
फिरून-फिरून करिसी वंचना
भुलविती वचने तुझी, खोटे-खोटे हसणे रे
भोळी-खुळी प्रीत माझी, पुन्हा-पुन्हा फसने रे

आसवांत न्हाऊन-न्हाऊन
सतत साहुन विरह वेदना

तुजसी मी प्रीत, सख्या, आज करणार ना
मन माझे अदय, प्रिया, मुळी झुरणार ना

मधुमय जीवन हसे, मधुर मधुमास हा
तनुवर लहरत ये, हरित मधुर भास हा
भिरभिर वाहतो, पवन मजसी पाहतो

साद त्या देईन, दुःख ना साहीन
हसत राहिन पुसुनी लोचना

तुजसी मी प्रीत, सख्या, आज करणार ना
मन माझे अदय, प्रिया, मुळी झुरणार ना

हृदया हसत रहा, हसत रहा सारखा
बघतो वळून पुन्हा, तो सुखात पारखा
नित-नित सूर नवे, नवे क्षितिजही हवे

कधी ना झुरेन, स्वैर मी फिरेन
तुला ना स्मरेण, ऐक साजना

तुजसी मी प्रीत, सख्या, आज करणार ना
मन माझे अदय, प्रिया, मुळी झुरणार ना

अनुदिन मोहित करुण
फिरून-फिरून करिसी वंचना

तुजसी मी प्रीत, सख्या, आज करणार ना
मन माझे अदय, प्रिया, मुळी झुरणार ना



Credits
Writer(s): Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link