Kashi Kaal Nagini

कशी काळनागिनी, सखे गं, वैरीन झाली नदी
प्राणविसावा पैलतिरावरी...
प्राणविसावा पैलतिरावरी अफाट वाहे मधी
कशी काळनागिनी, सखे गं, वैरीन झाली नदी

सुखी मी न हे तरतीन गणुनी लाटा कोट्यावधी
सुखी मी न हे तरतीन गणुनी लाटा कोट्यावधी
सुखी पाखरे गात चालली...
सुखी पाखरे गात चालली पार वादळी सुधी
कशी काळनागिनी, सखे गं, वैरीन झाली नदी

पैलतटी न का तृण मी झाले? तुडविता तरी पदी
पैलतटी न का कदंब फुलले?
पैलतटी न का कदंब फुलले? करिता माळा कधी
कशी काळनागिनी, सखे गं, वैरीन झाली नदी

पापिन खिळले तिरा...
पापिन खिळले तिरा विरह हा शस्त्राविन वधी
प्राणाचे घे मोल नाविका...
प्राणाचे घे मोल नाविका, लावि पार ने अधी
कशी काळनागिनी, सखे गं, वैरीन झाली नदी



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, B R Tambe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link