Dagala Lagali Kala

जसा जीवात जीव घुटमळं
तसं पिरतीचं वाढतंय बळं
तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळं गं
अन हे बघून दुश्मन जळं

वर ढगाला लागली कळं
पाणी थेंब-थेंब गळं
ढगाला लागली कळं
पाणी थेंब-थेंब गळं

वर ढगाला लागली कळं
पाणी थेंब-थेंब गळं

चल गं राणी, गाऊया गाणी
फिरुया पाखरासंग
रामाच्या पाऱ्यात, गार-गार वाऱ्यात
अंगाला भिडु दे अंग

हे जवा तुझं अन माझं जुळं
पाणी थेंब-थेंब गळं
(ढगाला लागली कळं)
(पाणी थेंब-थेंब गळं)

सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा
कुठं हा घेऊन जावा?
काय बाई अपरीत, झालंया इपरीत
सश्याला बीळ कुणी दावा

माझ्या पदरात पडलंय खूळं
पाणी थेंब-थेंब गळं
(ढगाला लागली कळं)
(पाणी थेंब-थेंब गळं)

जमीन आपली उन्हानं तापली
लाल-लाल झालीया माती
करूया काम अन गाळूया घाम
चला पिकवू माणिक मोती

एका वर्सात होईल तीळं
पाणी थेंब-थेंब गळं
(ढगाला लागली कळं)
(पाणी थेंब-थेंब गळं)

शिवार फुलतंय, तोऱ्यात डुलतंय
झोकात नाचतोय धोतरा
तुरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा
लपलाय भुईमूग भित्रा

मध्ये वाटाणा बघ वळवळ
पाणी थेंब-थेंब गळं
(ढगाला लागली कळं)
(पाणी थेंब-थेंब गळं)

झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल
वराडतिया कोकिळा
चिमणी झुरते उगीच
राघू-मैने वरती खुळा

मोर लांडोरी संग खेळं
पाणी थेंब-थेंब गळं
(ढगाला लागली कळं)
(पाणी थेंब-थेंब गळं)

थुई-थुई नाचते, खुशीत हासते
मनात फुलपाखरू
सोडा की राया, नाजूक काया
नका गुदगुल्या करू

तु दमयंती, मी नळं
पाणी थेंब-थेंब गळं
(ढगाला लागली कळं)
(पाणी थेंब-थेंब गळं)

बामणाच्या मळ्यात, कमळाच्या तळ्यात
येशील का संध्याकाळी?
जाऊ दुसरीकडं, नको बाबा तिकडं
बसलाय संतू माळी

म्हाताऱ्याला त्या लागलाय चळं
पाणी थेंब-थेंब गळं
(ढगाला लागली कळं)
(पाणी थेंब-थेंब गळं)

आलोया फर्मात, पडलोय पेरमात
सांग मी दिसतोय कसा?
सांगू, अडाणी ठोकळा, मनाचा मोकळा
पांडू हवालदार जसा

तुझ्यावाचून जीव तळमळ
पाणी थेंब-थेंब गळं
(ढगाला लागली कळं)
(पाणी थेंब-थेंब गळं)



Credits
Writer(s): Raam Laxman, Dada Kondke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link