Dubhangun Jata Jata

दुभंगून जाता-जाता मी अभंग झालो

दुभंगून जाता-जाता मी अभंग झालो
चिरा-चिरा जुळला माझा
चिरा-चिरा जुळला माझा, आत दंग झालो

दुभंगून जाता-जाता मी अभंग झालो
मी अभंग झालो

सल जुनेच सलता-सलता सुखावून गेले
अन हळूच गुणगुणती हे वळण मोजलेले
सल जुनेच सलता-सलता सुखावून गेले
अन हळूच गुणगुणती हे वळण मोजलेले
वळण मोजलेले

कशी कथा सरता-सरता...
कशी कथा सरता-सरता पूर्वरंग झालो

दुभंगून जाता-जाता मी अभंग झालो
मी अभंग झालो

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो
अन असाच वणवणताना मी मला मिळालो
किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो
अन असाच वणवणताना मी मला मिळालो
मी मला मिळालो

सर्व संग सुटले माझा
सर्व संग सुटले माझा, मीच संग झालो

दुभंगून जाता-जाता मी अभंग झालो
मी अभंग झालो

ज्ञानदेव लिहून गेले ओळ-ओळ भाळी
ज्ञानदेव लिहून गेले ओळ-ओळ भाळी
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी
निमित्तास टाळी

तरू काय इंद्रायणीचा...
तरू काय इंद्रायणीचा मी तरंग झालो

दुभंगून जाता-जाता मी अभंग झालो
मी अभंग झालो

चिरा-चिरा जुळला माझा
चिरा-चिरा जुळला माझा, आत दंग झालो
दुभंगून जाता-जाता मी अभंग झालो



Credits
Writer(s): Suresh Bhat, Ravi Date
Lyrics powered by www.musixmatch.com

Link