Puja Ho Dattaguru Dinraat (Lofi)

पुजा हो दत्तगुरू दिन-रात
पुजा हो दत्तगुरू दिन-रात
सौख्य-शांतिचा प्रसाद मिळतो
सौख्य-शांतिचा प्रसाद मिळतो
दत्तगुरू पूजनात

पुजा हो दत्तगुरू दिन-रात
पुजा हो दत्तगुरू दिन-रात

ब्रह्मा, विष्णू सवे महेश्वर
त्रैमूर्तीचे रूप मनोहर
ब्रह्मा, विष्णू सवे महेश्वर
त्रैमूर्तीचे रूप मनोहर

अनसूयेच्या सदनी भूवर
रमले आनंदात
पुजा हो दत्तगुरू दिन-रात
पुजा हो दत्तगुरू दिन-रात

शामल नयनी, प्रेमळ दृष्टी
सदा कृपेची करिती वृष्टी
शामल नयनी, प्रेमळ दृष्टी
सदा कृपेची करिती वृष्टी

भक्त जनांच्या पाठीवरती
फिरवी कोमल हात
पुजा हो दत्तगुरू दिन-रात
पुजा हो दत्तगुरू दिन-रात

प्रसन्न होऊनी दत्त दिगंबर
उद्धरती हे सर्व चराचर
प्रसन्न होऊनी दत्त दिगंबर
उद्धरती हे सर्व चराचर

अत्री नंदन, करुणा सागर
नित्य असो स्मरणात
पुजा हो दत्तगुरू दिन-रात
पुजा हो दत्तगुरू दिन-रात

सौख्य-शांतिचा प्रसाद मिळतो
सौख्य-शांतिचा प्रसाद मिळतो
दत्तगुरू पूजनात
पुजा हो दत्तगुरू दिन-रात
पुजा हो दत्तगुरू दिन-रात



Credits
Writer(s): Gulab Bhedodkar, R. N. Paradkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link