Datta Digambar Daiwat Majhe (Lofi)

दत्त दिगंबर दैवत माझे
दत्त दिगंबर दैवत माझे

दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे
दत्त दिगंबर दैवत माझे

अनुसूयेचे सत्व आगळे
अनुसूयेचे सत्व आगळे
तीन्ही देवही झाली बाळे, झाली बाळे

त्रैमूर्ती अवतार, मनोहर
त्रैमूर्ती अवतार, मनोहर
दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे
दत्त दिगंबर दैवत माझे

तीन शिरे, कर सहा शोभती
तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
हास्य मधुर शुभ वदनावरती

जटाजूट शिरि, पायी खडावा, पायी खडावा
भस्मविलेपीत कांती साजे
दत्त दिगंबर दैवत माझे

पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती
पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती, आसू झरती

सारे सात्विक भाव उमलती, भाव उमलती
हळूहळू सरते मीपण माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे

दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे
दत्त दिगंबर दैवत माझे



Credits
Writer(s): Kavi Sudhanshu, R. N. Paradkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link