Gandh Phulancha Gela Sangun - Jhankar Beats

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन
गंध फुलांचा गेला सांगून

सहज एकदा जाता-जाता
मिळूनी हसल्या आपुल्या नजरा

दो हृदयांच्या रेशीमगाठी
प्रीत भावना गेली बांधून, गेली बांधून
व्हावे मिलन

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन

विरह संपता मिलनाची
अमृतगोडी चाखीत असता

सखया, अवचित जवळी येता
ढळे पापणी, गेले लाजून, गेले लाजून
व्हावे मिलन

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन

मना-मनांच्या हर्षकळ्यांची
आज गुलाबी फुले जाहली

वरमाला ही त्याच फुलांची
गुंफून, सखया, तुलाच वाहीन, तुलाच वाहीन
व्हावे मिलन

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन



Credits
Writer(s): P Savalaram, Tiruchirapalli Krishnaswamy Ramamoorthy, Manayangath Subramanian Viswanathan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link