Sharad Sundar Chanderi Rati - Jhankar Beats

शारद सुंदर चंदेरी राती...
ला-ला, ला-ला-ला-ला-ला-ला

शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत, साजणा, झुलव मला
साजणा रे, मोहना रे, ऐकना रे

तुझ्याचसाठी रे, तुझ्याचसाठी
सगे-सोयरे मी सांडिले पाठी
तुझ्याचसाठी रे, तुझ्याचसाठी
सगे-सोयरे मी सांडिले पाठी

शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत, साजणा, झुलव मला

मोहन मधुरराती भराला येऊ दे प्रीती
प्रीतीची हीच ना रीती? कशाला कुणाची भीती?

झाडामागे चांद हा वरती आला
ये ना, ये ना, आतुर जीव हा झाला
मी भूलावे, स्वैर व्हावे, गीत गावे

शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत, साजणा, झुलव मला

वाऱ्यात लहर मंद, फुलांचा मादक गंध
मोगरा-चमेली कुंद जिवाला करिती धुंद

माझ्या देही पुनवचांदणे साजे
प्राणांमध्ये प्रीतीची पावरी वाजे
आज राया, धुंद काया, मोहवाया

शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत, साजणा, झुलव मला
साजणा रे, मोहना रे, ऐकना रे

तुझ्याचसाठी रे, तुझ्याचसाठी
सगे-सोयरे मी सांडिले पाठी



Credits
Writer(s): Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link