Gorya Gorya Tachat Kata Rutala

आडवाटेनं जाता-जाता तोल माझा सुटला
आडवाटेनं जाता-जाता तोल माझा सुटला
तोल सुटला गं, तोल-तोल सुटला, आई गं

गोऱ्या-गोऱ्या टाचंत काटा रुतला
गोऱ्या-गोऱ्या टाचंत काटा रुतला

(सुया आणा गं, बिब्बं आणा गं)
(वाटून लावा झाडपाला)
(हिच्या गोऱ्या टाचंत काटा रुतला)
(हिच्या गोऱ्या टाचंत काटा रुतला)

सरसरून कळ ही आली
सरसरून कळ ही आली
डोळं मिटलं नि बसले खाली
डोळं मिटलं नि बसले खाली

दात रोविता व्हटावरी मी
घाम अंगी फुटला
दात रोविता व्हटावरी मी
घाम अंगी फुटला

गोऱ्या-गोऱ्या टाचंत काटा रुतला
गोऱ्या-गोऱ्या टाचंत काटा रुतला

(अंगारा लावा, कोंबडं कापा)
(घेऊन या गं देवऋषला)
(हिच्या गोऱ्या टाचंत काटा रुतला)
(हिच्या गोऱ्या टाचंत काटा रुतला)

कुणी येऊन सावरा मला
अहो, कुणी येऊन सावरा मला
काटा काढायची दावा कला
काटा काढायची दावा कला

उसासा देता धागा चोळीचा
नको तिथं तुटला
उसासा देता धागा चोळीचा
नको तिथं तुटला

बाई गं, गोऱ्या-गोऱ्या टाचंत काटा रुतला
गोऱ्या-गोऱ्या टाचंत काटा रुतला
अगं, थांब मी काढतो की

(काटा बी न्हाई, काहीच न्हाई)
(नुसतीच आलिया लाडाला)
न्हाई, माझ्या टाचंत काटा रुतला
न्हाई-न्हाई, माझ्या टाचंत काटा रुतला



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Bal Palsule
Lyrics powered by www.musixmatch.com

Link