Solava Varis Dhokyacha

तरुणपणाचं रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं
अन् सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं
(बाई, सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं)
(अगं, सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं)

पिसाट वारा मदनाचा पतंग उडवी पदराचा
(पिसाट वारा मदनाचा बाई, पतंग उडवी पदराचा)
तोल सुटावा अशी वेळ ही...
तोल सुटावा अशी वेळ ही तरी चालणं ठेक्याचं

सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं
(हाय-हाय, सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं)
(अगं, सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं)

रात रुपेरी फुलली गं, मला पौर्णिमा भुलली गं
(रात रुपेरी फुलली गं अन् मला पौर्णिमा भुलली गं)
अंगावरती सांडु लागलं...
अंगावरती सांडु लागलं टिपूर चांदणं रूप्याचं

सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं
(अगं बाई, सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं)

ओढ लागली संगतीची, नजरभेटीच्या गमतीची
(ओढ लागली संगतीची बाई, नजरभेटीच्या गमतीची)
आज मला हे गुपीत कळलं...
आज मला हे गुपीत कळलं जत्रामधल्या धक्क्याचं

सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं
(व्हंय चल, सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं)



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Vasant Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link