Ghodyala Ghala Lagam

लई चौखुर सुटलंय बघा
दरी-डोंगरात देईल दगा
अन नीती कमरंची सोडू नगा

मुक्काम ऱ्हायला दूर, साजणा
मुक्काम ऱ्हायला दूर, साजणा
हितच फुटला घाम

अहो राया, घोडयाला घाला लगाम
राया, जरा घोडयाला घाला लगाम
राया, जरा घोडयाला घाला लगाम

लई मस्तिनं फुरफुर करतो
माती उकरून रिंगाण धरतो
माती उकरून रिंगाण धरतो

अदनं-मधनं झाडीत शिरतो
अवती-भवतीनं धुंदीत फिरतो
अवती-भवतीनं धुंदीत फिरतो

नखरा ह्याचा लई धोक्याचा
नखरा ह्याचा लई धोक्याचा
न्यारंच ह्याचं काम

अहो राया, घोडयाला घाला लगाम
राया, जरा घोडयाला घाला लगाम
राया, जरा घोडयाला घाला लगाम

भ्या वाटतंया उतरा खाली
नवेपणाची भोवळ आली
नवेपणाची भोवळ आली

ह्या द्वाडानं किमया केली
नाक घासतोया गुलाबी गाली
नाक घासतोया गुलाबी गाली

रागा-रागानं विकून टाका
रागा-रागानं विकून टाका
परत मागा दाम

अहो राया, घोडयाला घाला लगाम



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link