Pikalya Panacha Deth

दरबार जुना ह्यो, हंड्या झुंबर नवं
मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर दिवं
अंगअंगी मी रंग खेळते, केसामधी मरवा

हो, पिकल्या पानाचा...
अहो, पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा
नख लागंल बेतानं खुडा
हो, नख लागंल बेतानं खुडा
केशरी चुना अन कात केवडा
केशरी चुना अन कात केवडा

लई दिसानं रंगलं विडा
हो, लई दिसानं रंगलं विडा
व्हटाची लाली टिपुनी घ्याया
मुखडा असा फिरवा

हो, पिकल्या पानाचा...
अहो, पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा
थोडी झुकून थोडी वाकते
थोडी झुकून थोडी वाकते
पडला पदर, लाज झाकते
हो, पडला पदर, लाज झाकते

नेम धरून बाण फेकते
हो, नेम धरून बाण फेकते
तुमची-माझी हौस इश्काची
तुमची-माझी हौस इश्काची
हळूहळू पुरवा

हो, पिकल्या पानाचा...
अहो, पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link