Tya Phoolanchya Gandh Koshi

त्या फुलांच्या गंधकोषी
सांग तू आहेस का?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का?
गात वायूच्या स्वरांने, सांग तू आहेस का?
त्या फुलांच्या गंधकोषी

मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का?
जीवनी या वर्षणारा, तू कृपेचा मेघ का?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का?

त्या फुलांच्या गंधकोषी

जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का?
जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का?
कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का?
या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का?

त्या फुलांच्या गंधकोषी
सांग तू आहेस का?
त्या फुलांच्या गंधकोषी



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, Suryakant Khandekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link