Dole Kashasathi

डोळे कशासाठी?
डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी
हो, डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी
हो, डोळे कशासाठी?

आला भरून पाऊस
आला भरून पाऊस नको एकटा जाऊस
आला भरून पाऊस नको एकटा जाऊस
अरे, सरी कशासाठी?
हो, सरी कशासाठी?
तुला बिलगून भिजून जाण्यासाठी

हो, डोळे कशासाठी?
डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी
हो, डोळे कशासाठी?

नाव तुझे मनातले, चांदणेच रानातले
नाव तुझे मनातले, चांदणेच रानातले
शब्द कशासाठी? कशासाठी?
शब्द कशासाठी?
तुला आठवून भरून येण्यासाठी

हो, डोळे कशासाठी?
डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी
हो, डोळे कशासाठी?

वेल मोहरून आली
वेल मोहरून आली, फुले अंगभर झाली
वेल मोहरून आली, फुले अंगभर झाली
हो, वारा कशासाठी?
हो, वारा कशासाठी?
गंधवनातून पाखरू होण्यासाठी

हो, डोळे कशासाठी?
डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी
हो, डोळे कशासाठी?

असा तुझा भरवसा, चांदण्याचा कवाडसा
असा तुझा भरवसा, चांदण्याचा कवाडसा
ओठ कशासाठी? कशासाठी?
ओठ कशासाठी?
थोडे थरारून जुळून जाण्यासाठी

हो, डोळे कशासाठी?
डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी
हो, डोळे कशासाठी? कशासाठी?

डोळे कशासाठी? कशासाठी?
डोळे कशासाठी? कशासाठी?
डोळे कशासाठी? कशासाठी?



Credits
Writer(s): Yashwant Dev, Mangesh Padgavkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link