Priya Aaj Aale

प्रिया आज आले मैफलीत माझ्या
रंग-सूर ल्याली पश्चिमा, गीतास आली लालीमा!

तुझी साद ऐकुनी मी रे फुलारून आले
सूरांतल्या चैतन्याने मीच गीत झाले
अमृतात न्हाली पौर्णिमा, प्राणांत उमले चंद्रमा

हळूहळू निशिगंधाचे प्रीतस्पर्श प्याले
निशांत हा होता मी रे उषास्वप्न झाले
लाविता तुझ्या मी कुंकुमा, हासे नभाची नीलिमा



Credits
Writer(s): Arun Paudwal, Santaram Nandgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link