Jeev Rangla

जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीरा नेशील, साथ मला देशील
काळीज माझं तू
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं
पुनवंचा चांद तू

जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल
सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू
खुळा आभाळ ढगाळं, त्याला रुढीचा इटाळं
माझ्या लाख सजणा, ही कांकणाची तोडं माळं तू

खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण
तुझ्या पायवं माखीन माझ्या जन्माचं गोंदण

जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीरा नेशील, साथ मला देशील
काळीज माझं तू
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं
पुनवंचा चांद तू

जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

श्वास तूCredits
Writer(s): Ajay Gogavale, Atul Gogavale, Sanjay Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link