Raja Lalkari Ashi De

राजा ललकारी अशी दे
हाक दिली साद मला दे

कुंकवाचा माझा धनी
बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवानी
मन भरून गेलंया
ओढ फुलाला वाऱ्याची
तशी खूण इशाऱ्याची
माझ्या सजनाला कळू दे
हाक दिली साद मला दे

सूर भेटला सूराला
गानं आलं तालावर
खुळ्या आनंदाचं माझ्या
हसू तुझ्या गालावर
भरजरीचा हिरवा
शेला पांघरून नवा
शिवार हे सारं फुलू दे

थेंब नव्हं हे घामाचं
त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा
लई मायाळू ही माती
न्याहारीच्या वखुताला
घडीभर ईसाव्याला
सावली ही संग मिळू दे



Credits
Writer(s): Req.
Lyrics powered by www.musixmatch.com

Link