Dindi Magun Dindi Aali

(जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी)
(जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी)

दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली
वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली
ध्यानी-मनी पांडूरंग, स्वप्नी दिसे पांडूरंग
ध्यानी-मनी पांडूरंग, स्वप्नी दिसे पांडूरंग

ब्रम्हानंदी लागली टाळी
वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली
(दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली)
(वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली)
वाळवंटी भेटा-भेटी झाली

सेना म्हणे, "माझा हरपला भाव
घर आठवेना विसरला गाव"
सेना म्हणे, "माझा हरपला भाव
घर आठवेना विसरला गाव"

विठ्ठलाच्या पायी घेतली ती धाव
विठ्ठलाच्या पायी घेतली ती धाव

करू आषाढी कार्तिकी, जन्म लावूया सार्थकी
करू आषाढी कार्तिकी, जन्म लावूया सार्थकी
भजण सदा सर्वकाळी

वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली
(दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली)
(वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली)

चोखा झाला वेडा नाचवी पताका
चोखा झाला वेडा नाचवी पताका
नाम गजराचा वाजवितो डंका
नाम गजराचा वाजवितो डंका

वारकरी या रे, घ्या रे आढाभागा
वारकरी या रे, घ्या रे आढाभागा

घाला तुळशीची माळ, हाती घ्या रे चिपळ्या-टाळ
घाला तुळशीची माळ, हाती घ्या रे चिपळ्या-टाळ
अबीर बुकाला मुभाळी

वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली
(दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली)
(वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली)

डोळा तुडवितो मायेचा चिखल
डोळा तुडवितो मायेचा चिखल
फिरे चाकावरी माठाचे कमळ
फिरे चाकावरी माठाचे कमळ

घट सावळा की विठ्ठल सावळा
घट सावळा की विठ्ठल सावळा

एक रूप, एक रंग टाळ-मृदुंगात दंग
एक रूप, एक रंग टाळ-मृदुंगात दंग
चंद्रभागा अमृतात न्हाली

(वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली)
दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली
वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली
वाळवंटी भेटा-भेटी झाली

(विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
विठ्ठला (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)

(विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
विठ्ठला (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
विठ्ठला (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)

(विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
विठ्ठला (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
विठ्ठला (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
विठ्ठला (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल) विठ्ठला

Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Bal Palsule, N/a Vijay
Lyrics powered by www.musixmatch.com

Link