Chala Sohla Baghu Aashadhi Varicha

राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
चला सोहळा बघू आषाढी वारीचा
चला सोहळा बघू आषाढी वारीचा

राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा

ए, हौशेनं गवशे नवसे या हितं आनंदाला न्हाय तोटा
हौशेनं गवशे नवसे या हितं आनंदाला न्हाय तोटा
वासुदेव सांगतो ऐका, वारीचा महिमा मोठा
वासुदेव सांगतो ऐका, वारीचा महिमा मोठा

१८ पगड जमली इथं नाही धरम, नाही जात
येती गरीब, कोणी श्रीमंत हरिनाम मुखानं गात
उघड्या पायानं चालती वाट कधी बोचत नाही काटं
वृंदावन घेवून शिरी भक्ती-भावानं घेऊन येती नारी
टाळ-मृदुंग घुमतो कानी केला गजर रानोरानी

झाला पहिला शकून रामाच्या पारीचा
झाला पहिला शकून रामाच्या पारीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा

कलियुगी या नवालं घडलं बहुरूपी सांगतोया
कलियुगी या नवालं घडलं बहुरूपी सांगतोया
शंकराच्या देवळाचा कसा कळस हालतोया
शंकराच्या देवळाचा कसा कळस हालतोया

पाय पडती आळंदी कढ जीव ज्ञानराज्यावर जडं
ओढ लागली भोळ्या भक्ताला कधी समाधी दर्शन घडं
देवाळाच्या भोवतीनं सारं कसं आवार फुलूनी जाई
टक लावून ही नवलाई चिडीचुप होऊनी पाही

जगी डंका वाजं अलंकापुरीचा
जगी डंका वाजं अलंकापुरीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा

वाखरी जवळी मैदानात खेळ देवाचा चालतो
ज्ञानेश्वर माऊलीचा घोडा रिंगण घालतो
ऐसपैस रिंगणात नारी रांगोळी घालती
रिंगणाचं आकरीत एकमेकात बोलती

लाख डोळ्याची नजर घोड्यावरती खेळती
माऊलीच्या किमयेला मन, बुद्धी का भुलली
अश्वराजाच्या बघा हो, कसा दरबारी थाट
पुण्यवान का पासती माती बघती या वाट

पुढं जाई अश्वराज, माग धावतोया वारा
इथं विज्ञान तंत्राला कसा मिळायचा थारा
तापाखालची ही धुळ कशी कपाळी लावती
भाविकांच्या डोळ्यातूंन दोन आसवं गळती

चमत्कार बघा रिंगण फेरीचा
चमत्कार बघा रिंगण फेरीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा

हा, अशी ही पंढरी चंद्रभागेच्या तिरी
किती वारकरी जमती
हजारो म्हणू, का लाखो म्हणू
कुणी किती करावी गणती

नदीला भेटाया सागर आला, असा वाहतो जथा
तीर्थ होऊनी राहिली अशी चंद्रभागेची कथा
नदीला भेटाया सागर आला, असा वाहतो जथा
तीर्थ होऊनी राहिली अशी चंद्रभागेची कथा

माना-पानाच्या पालख्या निघती ओळीनं-शिस्तीनं
विराट दर्शन वारीचं घ्या हो उदंड भक्तीनं
राज्य पंढरीचा वाट बघतो ज्ञानोबाच्या भेटीसाठी
डोळं भरून, भरल्या डोळ्यानं बघावी ही भेटा-भेटी

ज्ञान राज्यानं रचिला पाया, ज्यानं बांधला कळस
ज्ञानबा, तुकोबा गजरात, भक्त वाहती तुळस
विठ्ठलाच्या पायावर डोई ठेवते भक्ती
विठ्ठलाची जवळी तिथं मागावी हो मुक्ती

धन्य होता जीव देव दरबारीचा
धन्य होता जीव देव दरबारीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा

राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा



Credits
Writer(s): Krishna, Bal Palsule, N/a Madhu
Lyrics powered by www.musixmatch.com

Link