Dev Jari Maj Kadhi Bhetala

देव जरी मज कधी भेटला
देव जरी मज कधी भेटला
"माग हवे ते, माग", म्हणाला
"माग हवे ते, माग", म्हणाला

म्हणेन प्रभू रे, माझे सारे
म्हणेन प्रभू रे, माझे सारे
जीवन देई मम बाळाला

देव जरी मज, देव जरी मज
देव जरी मज कधी भेटला

कृष्णा, गोदा स्नान घालू दे
रखुमामाई तीट लावू दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी
मुक्ताई निजवु दे तुजला

देव जरी मज, देव जरी मज
देव जरी मज कधी भेटला

शिवरायाच्या मागीन शौर्या
कर्णाच्या घेईन औदाऱ्या
ध्रुव-चिलयाचा अभंग प्रेमा
लाभू दे चिमण्या राजाला
लाभू दे चिमण्या राजाला

देव जरी मज कधी भेटला



Credits
Writer(s): Vasant Shantaram Desai, P. Savalaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link