Nimbonichya Zadamaage

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही?
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई

गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाईजुई

मिट पाकळ्या डोळ्यांच्या, ओ
मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही?
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई

देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी

जगावेगळी ही ममता, ओ
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही?
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई



Credits
Writer(s): Madhusudan Kalelkar, N Dutta
Lyrics powered by www.musixmatch.com

Link