Sadhi Bholi Meera

अरे, मनमोहना, अरे, मनमोहना

कळली देवा तुला, राधिका रे, राधिका
कळली राधिका रे, कळल्या गोपिका
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी-माझी प्रीत कधी जुळली नाही

अरे, मनमोहना रे (मोहना रे, मोहना)
हो, कळली देवा तुला राधिका रे, राधिका रे
(राधिका रे, राधिका)
कळली राधिका रे, कळल्या गोपिका
(कळल्या गोपिका)

साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी-माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे, मनमोहना रे, मोहना रे, मोहना

सात सुरांवर तन-मन नाचे
तालावरती मधुबन नाचे
सात सुरांवर तन-मन नाचे
तालावरती मधुबन नाचे

एक अबोली होती फुलली
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही

साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी-माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे, मनमोहना रे, मोहना रे, मोहना

धुंद सुगंधी यमुना लहरी
उजळून आली गोकुळ नगरी
धुंद सुगंधी यमुना लहरी
उजळून आली गोकुळ नगरी

जीवन माझे अंधाराचे
जीवन माझे अंधाराचे
काळी-काळी रात कधी टळली नाही

साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी-माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे, मनमोहना रे, मोहना रे, मोहना

उन्हात काया, मनात छाया
कशी समजावू वेडी माया
उन्हात काया, मनात छाया
कशी समजावू वेडी माया

युग-युग सरले, डोळे भरले
युग-युग सरले, डोळे भरले
आशेची कळी कधी फुलली नाही

साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी-माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे, मनमोहना रे (मोहना रे, मोहना)

हो, कळली देवा तुला राधिका रे, राधिका रे
(राधिका रे, राधिका)
कळली राधिका रे, कळल्या गोपिका
(कळल्या गोपिका)

साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी-माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे, मनमोहना रे, मोहना रे, मोहना, आ-आ



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, N Dutta
Lyrics powered by www.musixmatch.com

Link