Jeev Bhulala (From "Lai Bhari")

जीव भुलला, रुणझुणला
जीव भुलला, रुणझुणला
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला

क्षण हळवा गुणगुणला
क्षण हळवा गुणगुणला
बावऱ्या या क्षणात श्वास हा गंधाळला

सूर हे छेडती, स्पंदने वेडी कोणती
बोलके होती स्पर्श सारे हे इशारे बोलती
सूर हे छेडती, स्पंदने वेडी कोणती
बोलके होती स्पर्श सारे हे इशारे बोलती
भावनांचे शब्द व्हावे, गीत ओठी मोहरावे
हरपुनी हे भान जावे, ये जरा

ना न ना ना न ना ना न ना ना न ना

क्षण हळवा गुणगुणला
क्षण हळवा गुणगुणला
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला

दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती
दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती
प्रेमरंगी मी भिजावे ते तुला ही जाणवावे
पांघरावे मी तुला ये अन् जरा

ना न ना ना न ना ना न ना ना न ना

जीव झुरला, तळमळला
क्षण हळवा दरवळला
बावऱ्या या क्षणात श्वास हा गंधाळला



Credits
Writer(s): Ajay-atul, Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link