Manmohana Tu Raja Swapnatala (From "Hamal De Dhamal")

मनमोहना, तू राजा स्वप्नातला
मनमोहना, तू राजा स्वप्नातला

चल ये राजसा, कसा लाभला
एकांत हा तुला-मला?
मनमोहना, तू राजा स्वप्नातला

आज रूप हे गोड तुझे, ना भरवसा उद्याचा
Hmm, खेळ तुझा प्रेमाचा घेईल जीव हमालाचा

मनमोहना, तू राजा स्वप्नातला
मनमोहना, तू राजा स्वप्नातला

कसे फुलावे सांग मला तू सप्तस्वरांचे गाणे?
सूर ना आपला जुळता, कसली धुंद होऊनी जाणे

ना असा होई गंधर्व कधी ही मूर्ख गाढवाचा, हा-हा
खेळ व्हायचा तुझा, जायचा जीव हमालाचा

मनमोहना, तू राजा स्वप्नातला
मनमोहना, तू राजा स्वप्नातला

मी ताल लईच्या जगात तुजला नेते
मी ताल लईच्या जगात तुजला नेते
चल टाक पाऊले, नृत्य तुला शिकविते

मोर पिसे लावून होई का मयूर कावळ्याचा? हा-हा
खेळ व्हायचा तुझा, जायचा जीव हमालाचा

मनमोहना, तू राजा स्वप्नातला
मनमोहना, तू राजा स्वप्नातला

हवा कशाला सरस्वतीचा अलंकार भाषेचा?
शब्द येऊ दे ओठांवरती मनात या प्रेमाचा

सहजपणे साकार होवू दे प्रेमभाव मनीचा
कशास आता अभिनय खोटा हसण्या, रडण्याचा?

आमच्या रडण्या-हसण्याचा हा खेळच श्रीमंतीचा, ना
खेळ व्हायचा तुझा, जायचा जीव हमालाचा

मनमोहना, तू राजा स्वप्नातला
मनमोहना, तू राजा स्वप्नातला

चल ये राजसा, कसा लाभला
एकांत हा तुला-मला?
मनमोहना, तू राजा स्वप्नातला
मनमोहना, तू राजा स्वप्नातला



Credits
Writer(s): Anil Mohile, Vivek Apate
Lyrics powered by www.musixmatch.com

Link