Bagh ughaduni dar

शोधून शिणला जीव आता रे
साद तुला ही पोहचल का?
दारो-दारी हुडकलं भारी
थांग तुझा कधी लागलं का?

श्याममुरारी, कुंजविहारी
तो शिरीहारी भेटलं का?
वाट मला त्या गाभाऱ्याची
आज कुणी तरी दावलं का?

(बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
(बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो
नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो
तुझ्या-माझ्यात भेटलं साऱ्यात तो
शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो

रोज वृंदावनी फोडी जो घागरी
तोच नाथा घरी वाहतो कावडी
गुंतला ना कधी मंदिरी-राऊळी
बाप झाला कधी, जाहला माऊली

भाव भोळा जिथे धावला तो तिथे
भाव नाही तिथे सांग धावलं का?
(बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
(बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

राहतो माऊलीच्या जिव्हारात जो
डोलतो मातलेल्या शिवारात तो
जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो
दाटुनी तोच आभाळी ओथंबतो

नाचवे वीज जो त्या नभाच्या उरी
होई काठी कधी आंधळ्याच्या करी
घेवूनी लाट ये जो किनाऱ्या वरी
तोल साऱ्या जगाचा ही तो सावरी

राहतो जो मनी, या जनी जीवनी
एका पाषाणी तो सांग मावलं का?
(बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
(बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

(बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
(बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
(बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
(बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link