Datale Abhaal - Male Version

दाटलं आभाळ हे, सोस ना उधाण हे
सैरभैर दिशा आज दाही
गुंतलाय जीव ह्यो साजणी तुझ्यामधी
मोडला हा डाव कशापाई?

कस सांवरू कळं ना, आधार का सापडना?
घडलं काय असा माझा गुन्हा?
कस सांवरू कळं ना, आधार का सापडना?
घडलं काय असा माझा गुन्हा?

हरपला सूर कुठं सांग साजणे?
दाटलं आभाळ हे, सोस ना उधाण हे
सैरभैर दिशा आज दाही

रातीचा अंधार, जीवाला विघोर
तुझ्याईना वाट आता जगणं अधूर
रातीचा अंधार, जीवाला विघोर
तुझ्याईना वाट आता जगणं अधूर

एकटी चालले मी काटेरी या वाटेवर
पदर फाटला अन् सुख ही गेली सांडून

चुकलीय वाट कुठं सांग साजणा?
दाटलं आभाळ हे, सोस ना उधाण हे
सैरभैर दिशा आज दाही

जीव एडापिसा काहूरला, तुला बघण्याला आतुरला
चांद हा एकला चकोरी विना राहिला
हो, सर आठवांची बरसली, व्याकुळ हरणी बावरली
नभाची आसव डोळ्यात माझ्या साठली

साता जन्माची गाठ, इसरलो रातो-रात
नेऊ कुठं तारु? माझा किनारा हा हरवला

संपल सारं कस सांग साजणा?
दाटलं आभाळ हे, सोस ना उधाण हे
सैरभैर दिशा आज दाही
गुंतलाय जीव ह्यो साजणी तुझ्यामधी
मोडला हा डाव कशापाई?



Credits
Writer(s): Vishwajeet Madhav Joshi, Avinash Shripad Chandrachud
Lyrics powered by www.musixmatch.com

Link