Datale Abhaal - Female Version

दाटलं अभाळ हे, सोसलं उधान हे
सैर-भैर दिशा आज दाही
गुंतलाय जीव ह्यो साजना तुझ्यामंदी
मोडला हा डाव कशापाई?

कशी सावरू कळना, आधार का सापडणा
घडला काय असा माझा गुन्हा?
कशी सावरू कळना, आधार का सापडणा
घडला काय असा माझा गुन्हा?

हरपला सूर कुठं, सांग साजणा?
दाटलं अभाळ हे, सोसलं उधान हे
सैर-भैर दिशा आज दाही

रातीचं अंधार जीवाला विघोर
तुझ्याइना वाटं आता जगणं अधुर
रातीचं अंधार जीवाला विघोर
तुझ्याइना वाटं आता जगणं अधुर

एकटी चालली मी काटरी या वाटवर
पदर फाटला अन सुखही गेले सांडून
चुकलिया वाट कुठं, सांग साजणा?

दाटलं अभाळ हे, सोसलं उधान हे
सैर-भैर दिशा आज दाही
गुंतलाय जीव ह्यो साजना तुझ्यामंदी
मोडला हा डाव कशापाई?



Credits
Writer(s): Vishwajeet Madhav Joshi, Avinash Shripad Chandrachud
Lyrics powered by www.musixmatch.com

Link