Jai Dev Jai Dev Jai Jai Shivarya

जय देव, जय देव, जय जय शिवराया
जय देव, जय देव, जय जय शिवराया
जय जय शिवराया
या-या अनन्य शरणा आर्या ताराया

(जय देव, जय देव, जय जय शिवराया)
(जय जय शिवराया)
(या-या अनन्य शरणा आर्या ताराया)
(जय देव, जय देव, जय जय शिवराया)

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला (म्लेच्छांचा घाला)
आला-आला सावध हो शिवभूपाला (हो शिवभूपाला)
सद्गदिता, भूमाता दे तुज हाकेला (दे तुज हाकेला)
करुणारव भेदूनी तंव हृदय न का गेला?

(जय देव, जय देव, जय जय शिवराया)
(जय जय शिवराया)
(या-या अनन्य शरणा आर्या ताराया)
(जय देव, जय देव, जय जय शिवराया)

श्रीजगदंबाजी तंव शुंभादीक भक्षी (शुंभादीक भक्षी)
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी (श्रीरघुवर संरक्षी)
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता (म्लेंच्छा ही छळता)
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?

(जय देव, जय देव, जय जय शिवराया)
(जय जय शिवराया)
(या-या अनन्य शरणा आर्या ताराया)
(जय देव, जय देव, जय जय शिवराया)

त्रस्त आम्ही, दीन आम्ही शरण तुला आलो (शरण तुला आलो)
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो (मरणोन्मुख झालो)
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया (दुष्कृती नाशाया)
भगवन भगवदगीता सार्थ कराया या

(जय देव, जय देव, जय जय शिवराया)
(जय जय शिवराया)
(या-या अनन्य शरणा आर्या ताराया)
(जय देव, जय देव, जय जय शिवराया)

आणि भीमाशंकरच्या जटात
अन नाट्यघटाच्या उठात वसलेल्या
किल्ले शिवनेरीवर उषःकाल झाला
शिवरायाचा जन्म झाला

पुत्र जिजाऊ साहेबांना झाला
पुत्र शहाजीराजांना झाला
पुत्र सह्याद्रीला झाला
पुत्र महाराष्ट्राला झाला

पुत्र भरतवर्षाला झाला
शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंदळू लागला
महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या
मुखानं अंगाई गीत गाऊ लागली



Credits
Writer(s): Swatantraya Veer, Hridaynath Mangeshkar, V. D. Savarkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link