Neej Re Neej Shivraya

गुणी बाळ असा, जागसी का रे वाया
गुणी बाळ असा, जागसी का रे वाया
नीज रे नीज शिवराया
गुणी बाळ असा, जागसी का रे वाया

अपरात्रीचा प्रहर लोटला बाई
तरी डोळा लागत नाही
हा चालतसे चाळा एकच असला
तिळ उसंत नाही जिवाला
निजवायाचा हरला सर्व उपाय

जागाच तरी शिवराय, चालेल जागता चटका
हा असाच घटका-घटका, कुरवाळा किंवा हटका
का कष्टविशी तुझी सावळी काया?
का कष्टविशी तुझी सावळी काया?

ही शांत निजे १२ मावळ थेट, शिवनेरी जुन्नरपेठ
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली
कोकणच्या १४ ताली
ये भिववाया बागुल तो बघ बाळा
किती बाई काळा-काळा

इकडे हे सिद्धि-जमान
तो तिकडे अफजुलखान
पलीकडे मुलुख मैदान
हे आले रे, तुजला बाळ धराया
हे आले रे, तुजला बाळ धराया
नीज रे नीज शिवराया
गुणी बाळ असा, जागसी का रे वाया



Credits
Writer(s): Govinda Graj, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link