Sadhi Bhotthi Rani (From "Mantryanchi Soon")

साधी-भोळी राणी, साधा-भोळा राजा
लाख मोलाचा गं संसार हा माझा
साधी-भोळी राणी...

जणू झोपडीचा राजवाडा हाई
हात जोडुनिया सुख उभं राही
...सुख उभं राही

दाही दिशा वारा करी गाजा-वाजा
लाख मोलाचा गं संसार हा माझा
साधी-भोळी राणी...

धरतीची शेज, ढगांची वाकाळ
रोज दारी यावी सोन्याची सकाळ

जसा की चाफ्याचा वास ताजा-ताजा, हो
जसा की चाफ्याचा वास ताजा-ताजा, हो
लाख मोलाचा गं संसार हा माझा
साधी-भोळी राणी...

वेगळं कशाला लेवू आता लेणं?
वेगळं कशाला लेवू आता लेणं?
किती तुला पाहू? किती घेऊ, दान, दान, दान?

पापण्यांनी केला बंद दरवाजा
लाख मोलाचा गं संसार हा माझा
साधी-भोळी राणी...



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Yashwant Dev
Lyrics powered by www.musixmatch.com

Link