Aale Rangat Mi (From "Mantryanchi Soon")

आज काहीतरी इपरित आलं घडून
एक सपान पडून भान गेलं उडून, ओ
...भान गेलं उडून

आता ज्वानीला...
आता ज्वानीला पदरात झाकू किती?
आले रंगात मी, रंग फेकू किती?
आता ज्वानीला पदरात झाकू किती?
आले रंगात मी, रंग फेकू किती?

राग-रुसव्याची होईल राजी-खुशी
राग-रुसव्याची होईल राजी-खुशी
सोनं आगीनं...
सोनं आगीनं होईल बावनकशी

तुम्हासाठी जगून, ओ, वाट तुमची बघून
तुम्हासाठी जगून, वाट तुमची बघून

नाच नाचून उसासा टाकू किती?
आले रंगात मी, रंग फेकू किती?
आता ज्वानीला पदरात झाकू किती?
आले रंगात मी, रंग फेकू किती?

आज बिजली फिरे रोमरोमात गं
आज बिजली फिरे रोमरोमात गं
पिंगा घालून अशी भिजली घामात गं

ठिणगी पायी उडल, तोल माझा सुटल
ठिणगी पायी उडल, तोल माझा सुटल

घुंगरू बांधाया...
घुंगरू बांधाया खाली वाकू किती?
आले रंगात मी, रंग फेकू किती?
आता ज्वानीला पदरात झाकू किती?

आले रंगात मी, रंग फेकू किती?
आता ज्वानीला पदरात झाकू किती?
आले रंगात मी, रंग फेकू किती?



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Yashwant Dev
Lyrics powered by www.musixmatch.com

Link