Kanada Wo Vithhalu

हा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
रत्नकीळ फाकती प्रभा

अगणित लावण्य तेज पुंजाळले
अगणित लावण्य तेज पुंजाळले
न वर्णवे तेथीची शोभा

कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
तेणें मज लावियला वेधु

खोळ बुंथी घेऊनि कुणाची पालवी?
खोळ बुंथी घेऊनि कुणाची पालवी?
आळविल्या नेदी सादु

कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
तेणें मज लावियला वेधु

शब्देविन संवादु, दुजेविन अनुवादु
शब्देविन संवादु, दुजेविन अनुवादु
हे तंव कैसे निगमे

परेहि परते बोलणे खुंटले
वैखरी कैसेनि सांगे
वैखरी कैसेनि सांगे

कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
तेणें मज लावियला वेधु

पाया पडूं गेले तंव पाउलचि न दिसे
पाया पडूं गेले तंव पाउलचि न दिसे
उभाचि स्वयंभु असे

समोर की पाठिमोरा न कळे
समोर की पाठिमोरा न कळे
ठकचि पडिले कैसे

कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
तेणें मज लावियला वेधु

क्षेमालागी जीव उतावीळ माझा
क्षेमालागी जीव उतावीळ माझा
म्हणवूनि स्फुरताती बाहो

क्षेम देऊ गेले तंव मीचि मी एकली
क्षेम देऊ गेले तंव मीचि मी एकली
आसावला जीव राहो

कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
तेणें मज लावियला वेधु



Credits
Writer(s): Hridyanath Mangeshkar, Saint Jnyaneshwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link