Jivlaga Rahile Dur Ghar

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, जिवलगा, जिवलगा

किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई
किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई
सुखसुमनांची, सुखसुमनांची सरली माया पाचोळा वाजे

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा

गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला
गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची, ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे
जिवलगा

निराधार मी, मी वनवासी, घेशील केव्हा मज हृदयाशी?
निराधार मी, मी वनवासी, घेशील केव्हा मज हृदयाशी?
तूच एकला, तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, जिवलगा

Credits
Writer(s): Shelke Shanta, Mangeshkar Hridyanath
Lyrics powered by www.musixmatch.com

Link