Hukmachi Rani Mi - Original

ऐका, हुकुमाची राणी मी...
हुकुमाची राणी मी माझे सगळे गुलाम
हुकुमाची राणी मी...

एक्का, दुर्री, तिर्री, चौकी करती सलाम
(हिला एक्का, दुर्री, तिर्री, चौकी करती सलाम)
हो-ओ, हुकुमाची राणी मी माझे सगळे गुलाम
हुकुमाची राणी मी...

माझ्या काळजाचा कुणा लागे ना ठाव, माझ्या
ज्याच्या-त्याच्या तोंडी बाई माझचं नाव
मारी मिशिवरी कुणी उगाच ताव

मदनाची रती मी, हा
मदनाची रती मी, माझ्या हाती लगाम
हुकुमाची राणी मी...

एक्का, दुर्री, तिर्री, चौकी करती सलाम
(हिला एक्का, दुर्री, तिर्री, चौकी करती सलाम)
हुकुमाची राणी मी माझे सगळे गुलाम
हुकुमाची राणी मी...

डोळे मारू नका, शीळ घालू नका मला
काही मिळणार न्हाई जिभल्या चाटु नका
खेळ असला तुम्ही इथं खेळू नका

पाखरू फिरतं मी, हा
पाखरू फिरतं मी, माझा नाही मुक्काम
हुकुमाची राणी मी...

एक्का, दुर्री, तिर्री, चौकी करती सलाम
(हिला एक्का, दुर्री, तिर्री, चौकी करती सलाम)
हो-ओ, हुकुमाची राणी मी माझे सगळे गुलाम
हुकुमाची राणी मी...



Credits
Writer(s): Raam Laxman, Anant Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link