Mee Ektich Majhi - Original

मी एकटीच माझी असते कधी-कधी
मी एकटीच माझी असते कधी-कधी
गर्दीत भोवतीच्या...
गर्दीत भोवतीच्या नसते कधी-कधी
मी एकटीच माझी...

येथे ना ओळखीचे कोणीच राहिले
येथे ना ओळखीचे कोणीच राहिले

होतात भास मजला...
होतात भास मजला नुसते कधी-कधी
मी एकटीच माझी...

जपते मनात माझा एकेक हुंदका
एकेक हुंदका

लपवीत आसवे मी...
लपवीत आसवे मी हसते कधी-कधी
मी एकटीच माझी...

मागेच मी कधीची हरपून बैसले
मागेच मी कधीची हरपून बैसले

आता नको-नकोशी...
आता नको-नकोशी दिसते कधी-कधी
मी एकटीच माझी...

जखमा बुजून गेल्या...
जखमा, हाय, जखमा

जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी

उसवीत जीवनाला बसते कधी-कधी
मी एकटीच माझी असते कधी-कधी
गर्दीत भोवतीच्या...
गर्दीत भोवतीच्या नसते कधी-कधी
मी एकटीच माझी असते कधी-कधी



Credits
Writer(s): Suresh Bhat, Shrikant Thakre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link