Samjavooni Vyathela Samjabhta N Aale - Original

समजावुनी व्यथेला समजावता न आले
समजावुनी व्यथेला समजावता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
समजावुनी व्यथेला समजावता न आले
सर एक श्रावणाची आली निघून गेली
सर एक श्रावणाची आली निघून गेली

माझ्या मुक्या तृशेला पण बोलता न आले
माझ्या मुक्या तृशेला पण बोलता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
समजावुनी व्यथेला समजावता न आले
चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझा
चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझा

देणे मलाच माझे नाकारता न आले
देणे मलाच माझे नाकारता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
समजावुनी व्यथेला समजावता न आले
केले जरी खुलासे मीही नको-नकोसे
केले जरी खुलासे मीही नको-नकोसे

जगणे अखेर माझे मज टाळता न आले
जगणे अखेर माझे मज टाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
समजावुनी व्यथेला समजावता न आले
समजावुनी व्यथेला समजावता न आले



Credits
Writer(s): Suresh Bhat, Ravi Date
Lyrics powered by www.musixmatch.com

Link