Dam Kari Kam - Original

पारा डोळ्यान पाप सारी नारायण बघतो
पैशापाई माणूस मरतो, पैशावर जगतो
पैशावर जगतो

वासुदेवाची ऐका वानी...
वासुदेवाची ऐका वानी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम
दाम करी काम येड्या, दाम करी काम

पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय झेप पैशाच्या मागुनी धाव
पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय झेप पैशाच्या मागुनी धाव

जल्मापासनं सारी मानसं...
हे, जल्मापासनं सारी मानसं ह्या पैशाची गुलाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम
दाम करी काम येड्या, दाम करी काम

कुणी जुगार सट्टेबाज, कुणी खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता, कुणी घेतो एकच घुटका
कुणी जुगार सट्टेबाज, कुणी खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता, कुणी घेतो एकच घुटका

शर्यत घोडा चौखुर सुटला
हे, शर्यत घोडा चौखुर सुटला, फेकला त्यानं लगाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम
दाम करी काम येड्या, दाम करी काम

ह्या कवडी दमडीपाई कुणी राकुस घेई जीव
कुणी डाका-दरोडा घाली, कुणी जाळून टाकी गाव
ह्या कवडी दमडीपाई कुणी राकुस घेई जीव
कुणी डाका-दरोडा घाली, कुणी जाळून टाकी गाव

बगलंमंदी सुरी दुधारी
बगलंमंदी सुरी दुधारी, मुखि देवाचं नाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम
दाम करी काम येड्या, दाम करी काम

नक्षत्रावानी पोरगी, बापाच्या गळ्याला फास
ठरल्यालं लगीन मोडतं, हुंड्याला पैसा नसं
नक्षत्रावानी पोरगी, बापाच्या गळ्याला फास
ठरल्यालं लगीन मोडतं, हुंड्याला पैसा नसं

काळीज भरलं शिरिमंतीनं
अहो, काळीज भरलं शिरिमंतीनं, हातात नाही छदाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम
दाम करी काम येड्या, दाम करी काम

वाड्यात पंगती बसल्या, लई आग्रेव जागोजाग
दारात भिकारी रडतो, पोटात भुकंची आग
वाड्यात पंगती बसल्या, लई आग्रेव जागोजाग
दारात भिकारी रडतो, पोटात भुकंची आग

संसाराचं ओझं घेऊन...
अहो, संसाराचं ओझं घेऊन कुणी टिपावा घाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम
दाम करी काम येड्या, दाम करी काम

नाचते नारीची अब्रू छनछुन्नक तालावरती
पैशानं बायको खूस, पैशानं बोलते पिरती
नाचते नारीची अब्रू छनछुन्नक तालावरती
पैशानं बायको खूस, पैशानं बोलते पिरती

ह्या पैशाच्या बादशहाला...
ह्या पैशाच्या बादशहाला दुनिया करते सलाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम
दाम करी काम येड्या, दाम करी काम

वासुदेवाची ऐका वानी...
वासुदेवाची ऐका वानी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम
दाम करी काम येड्या, दाम करी काम

दाम करी काम येड्या, दाम करी काम
दाम करी काम येड्या, दाम करी काम
दाम करी काम येड्या, दाम करी...



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Prabhakar Jog
Lyrics powered by www.musixmatch.com

Link