Door Rahuni Pahu Nako - Original

दूर राहुनी पाहु नको रे
दूर राहुनी असा पाहु नको रे
प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे
प्रिया, जाऊ नको रे

प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे
प्रिया, जाऊ नको रे
दूर राहुनी पाहु नको रे

कसा इशारा तुला कळे ना
शब्द मिळाले, सूर जुळे ना
कसा इशारा तुला कळे ना
शब्द मिळाले, सूर जुळे ना

कळली तुझी कला, घे ना जवळ मला
कळली तुझी कला, घे ना जवळ मला
Umm, जवळ घे

नखऱ्याचा रंग मला दावू नको रे
प्रिया, जाऊ नको रे
दूर राहुनी पाहु नको रे

अवती-भवती बहर फुलांचा
भ्रमर लुटेना थेंब मधाचा
अवती-भवती बहर फुलांचा
भ्रमर लुटेना थेंब मधाचा

लाजे कळी-कळी, गाली पडे खळी
लाजे कळी-कळी, गाली पडे खळी
Hmm, अस रे काय?

फिरवून पाठ असा राहू नको रे
प्रिया, जाऊ नको रे
दूर राहुनी पाहु नको रे

भाव मनीचे जाणुन घ्यावे
दोन जिवांचे धागे जुळावे
भाव मनीचे जाणुन घ्यावे
दोन जिवांचे धागे जुळावे

सांगू कशी तुला, माझ्या प्रीतफुला?
सांगू कशी तुला, माझ्या प्रीतफुला?
ऐ, बोल ना रे

हुरहुर आज अशी लावू नको रे
प्रिया, जाऊ नको रे
दूर राहुनी पाहु नको रे
प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे
प्रिया, जाऊ नको रे



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Prabhakar Jog
Lyrics powered by www.musixmatch.com

Link