Fandi Fandi Halbit Basla

फांदी-फांदी हलवीत बसला होऊन वारा खुळा
(गं बाई, होऊन वारा खुळा)
फांदी-फांदी हलवीत बसला होऊन वारा खुळा
(होऊन वारा खुळा, गं बाई, होऊन वारा खुळा)

आला बाई बहरून ज्वानीचा मळा
आला बाई बहरून ज्वानीचा मळा

हिरवा शालू भरीन आला
कणीस-कणीस नितावलं
मोकाट वळू पिकात शिरला
रान पाखरानं भंडावलं

(रान पाखरानं भंडावलं)
रान पाखरानं भंडावलं

पिकलिया सुगी, चला बिगी-बिगी
पिकलिया सुगी, चला बिगी-बिगी
(पिकलिया सुगी, चला बिगी-बिगी)
(पिकलिया सुगी)

ठेवलाया कुणीतरी डोळा
आला बाई बहरून ज्वानीचा मळा
आला बाई बहरून ज्वानीचा मळा

पेरूच्या बागा, रामफळ बघा
हळूहळू तोडा गाभूळलं
सीताफळ पिकली, फांदी-फांदी वाकली
ओझ्यानं झाड लय व्याकुळलं

(ओझ्यानं झाड लय व्याकुळलं)
ओझ्यानं झाड लय व्याकुळलं

चाखून सांगा, रोखीन मागा
चाखून सांगा, रोखीन मागा
(चाखून सांगा रोखीन मागा)
(चाखून सांगा)

करू नका हो चलगे चाळा
आला बाई बहरून ज्वानीचा मळा
आला बाई बहरून ज्वानीचा मळा

फांदी-फांदी हलवीत बसला होऊन वारा खुळा
(होऊन वारा खुळा, गं बाई, होऊन वारा खुळा)
आला बाई बहरून ज्वानीचा मळा
आला बाई बहरून ज्वानीचा मळा



Credits
Writer(s): M D Devkate
Lyrics powered by www.musixmatch.com

Link