Majhya Re Preeti Phoola

माझ्या रे प्रीती फुला, ठेवू मी कोठे तुला
माझ्या रे, माझ्या प्रीती फुला
माझ्या...

मिरवू माथी का तुला मी, दगिना तू लाडका
दावू का ऐश्वर्य माझे, उघड साऱ्या निंदका
काळजाचा कंद तू रे, रंग डोळ्यातला

हो, माझ्या रे प्रीती फुला
माझ्या...

अधीर हळवे दोन डोळे, पुष्पपात्रे ही निळी
ठेविसी तेथे फुला तू, फुलत जाते पाकळी
भोवताली गंध दाटे, धुंद चैत्रातला

हो, माझ्या रे प्रीती फुला
माझ्या...

तूच नयनी तूच हृदयी, तूच वसशी जीवनी
काळ जाई कळत नाही, दिवस किंवा यामिनी
आणीला गे काय संगे, गंध स्वर्गातला

हो, माझ्या रे प्रीती फुला, ठेवू मी कोठे तुला
माझ्या रे, माझ्या प्रीती फुला
माझ्या...



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link