Vara Sute Sukhacha

वारा सुटे सुखाचा
आनंद मेघ आले, मी अमृतात न्हाले, ओ
वारा सुटे सुखाचा

अनिकेत त्यास लाभे सिंहासनी निवारा
नौकेस हात द्याया आला पुढे किनारा
कोमेजल्या लतेचा होऊन कुंज डोले
मी अमृतात न्हाले, ओ
वारा सुटे सुखाचा

माझी मलाच कैसी झाले अनोळखी मी?
तिन्ही जगात आता माझ्यापरी सुखी मी
हे भाग्य सोसवेना, होतात नेत्र ओले
मी अमृतात न्हाले, ओ
वारा सुटे सुखाचा

माझे मला कळेना आले घडून कैसे?
उल्केस आज लाभे चैतन्य तारकेचे
उचलावया शिळा ती आभाळ नम्र झाले
मी अमृतात न्हाले, ओ

वारा सुटे सुखाचा
आनंद मेघ आले, मी अमृतात न्हाले, ओ
वारा सुटे सुखाचा



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link