Paap Tharauni Punyaila

खेळ कळे ना तुझा
खेळ कळे ना तुझा

पाप ठरवुनी पुण्याईला
देसी देवा सजा
खेळ कळे ना तुझा
खेळ कळे ना तुझा

स्वप्न पाहिले, स्वप्न भोगले
त्या स्वप्नातून आज जागले

अपराधाविन तापे मजवरी
स्वप्नामधला राजा
खेळ कळे ना तुझा
खेळ कळे ना तुझा

राणी पद हे धनीभव-दौलत
ज्याची त्याला असो समर्पित

माझ्यासाठी आठ दिशांचा
उघडा दरवाजा
खेळ कळे ना तुझा
खेळ कळे ना तुझा

आभाळाची शिरी सावली
शिरी सावली, सावली, सावली
पाठ धरणीची तळी पाऊली
तळी पाऊली, पाऊली, पाऊली

निराधार हा सुरू होत असे
प्रवास आता माझा
खेळ कळे ना तुझा
खेळ कळे ना तुझा



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link