Ka Chinta Karisi

का चिंता करिसी?
प्राण्या, का चिंता करिसी?
नयनी गंगा, हृदयी काशी
का चिंता करिसी?

नयनी गंगा, हृदयी काशी
का चिंता करिसी?
नयनी गंगा, हृदयी काशी
का चिंता करिसी?

दो पायावर रचतो सुंदर
देहाचे जो मंगल देऊळ
दो पायावर रचतो सुंदर
देहाचे जो मंगल देऊळ

तोच चालवी अपुले पाऊल
का मागे बघसी?

का चिंता करिसी?
नयनी गंगा, हृदयी काशी
का चिंता करिसी?
नयनी गंगा, हृदयी काशी
का चिंता करिसी?

घर हे सुटता, नाते तुटता
जगही झाले जरी पारखे
घर हे सुटता, नाते तुटता
जगही झाले जरी पारखे

सुख-दु:खही रे तुला सारखे
का डोळे पुससी?

का चिंता करिसी?
नयनी गंगा, हृदयी काशी
का चिंता करिसी?
नयनी गंगा, हृदयी काशी
का चिंता करिसी?

चंद्र हासरा गोड मुखाचा
रसाळ वाणी अमृताची
चंद्र हासरा गोड मुखाचा
रसाळ वाणी अमृताची

प्रेमळ दृष्टी तुझ्या मनाची
देव तुझ्यापाशी

का चिंता करिसी?
नयनी गंगा, हृदयी काशी
का चिंता करिसी?
नयनी गंगा, हृदयी काशी
का चिंता करिसी?

का चिंता करिसी?
का चिंता करिसी?
का चिंता करिसी?



Credits
Writer(s): Vasant Prabhu, P Savalaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link