Asaach Hota Manaat Maaiya

असाच होता मनात माझ्या, माझा साजण गं
स्वप्नी पाहिला, तसा भेटला, माझा साजण गं
माझ्या सजणा रे, माझ्या राजा
माझ्या सजणा रे, माझ्या राजा

जणू कळीला फुलवायाला
आला अवखळ हा गंधवारा
आला अवखळ हा गंधवारा
फुल, वेलीला मिळे आसरा

जसा लाटेस लाभे किनारा
जसा लाटेस लाभे किनारा

असाच होता मनात माझ्या, माझा साजण गं
अशीच होती मनात माझ्या, माझी सजणी गं
माझी सजणी, माझी राणी
माझी सजणी गं, माझी राणी

आकाशीची जणू परीही
माझ्यासाठीच उतरून आली
माझ्यासाठीच उतरून आली
पुरा गुंतलो, गुलाम झालो

तिच्या प्रितीनं ही जादू केली
तिच्या प्रितीनं ही जादू केली

अशीच होती मनात माझ्या, माझी सजणी गं
स्वप्नी पाहिला, तसा भेटला, माझा साजण गं
माझ्या सजणा, माझी सजणी
माझ्या राजा रे, माझी राणी

नवीन मांडू जग दोघांचे
जिथे दुःखाची चाहूल नाही
जिथे दुःखाची चाहूल नाही
आता न मागे वळायचे गं

आता थांबायचे ना कुठेही
आता थांबायचे ना कुठेही

असाच होता मनात माझ्या, माझा साजण गं
अशीच होती मनात माझ्या, माझी सजणी गं
माझ्या सजणा, माझी सजणी
माझ्या राजा रे, माझी राणी



Credits
Writer(s): Traditional, Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link