Are Sansar Sansar

अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर

अरे, संसार-संसार, खोटा कधी म्हणू नये
राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये
अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर

अरे, संसार-संसार, नाही रडनं, कुढनं
अरे, संसार-संसार, नाही रडनं, कुढनं
येड्या, गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं
अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर

अरे, संसार-संसार, दोन जिवांचा विचार
अरे, संसार-संसार, दोन जिवांचा विचार
देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार
अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
अरे, संसार-संसार



Credits
Writer(s): Bahinabai Chaudhary, Vasant Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link