Dhartrichya Kushimadhy

धरित्रीच्या कुशीमध्ये बिय-बियाणं निजली
वर पसरली माती जशी शाल पांघरली
धरित्रीच्या कुशीमध्ये बिय-बियाणं निजली
वर पसरली माती जशी शाल पांघरली

बीय टरारे भुईत, सर्व कोंब आले वर
गहिवरलं शेत जसं अंगावरती शहारं
अंगावरती शहारं

ऊन-वाऱ्याशी खेळता एका-एका कोंबांतून
प्रगटली दोन पानं जशी हात ही जोडून
प्रगटली दोन पानं जशी हात ही जोडून

टाळ्या वाजवीती पानं दंग देवाच्या भजनी
(टाळ्या वाजवीती पानं दंग देवाच्या भजनी)
जशी करती करुणा होऊ दे रे आबादनी
(जशी करती करुणा होऊ दे रे आबादनी)

दिसामासा होय वाढ, रोप झाली आता मोठी
(दिसामासा होय वाढ, रोप झाली आता मोठी)
आला पिकाला बहर, झाली शेतामध्ये दाटी
(आला पिकाला बहर, झाली शेतामध्ये दाटी)

कसे वाऱ्यानं डोलती दाणे आले गाडी-गाडी
कसे वाऱ्यानं डोलती दाणे आले गाडी-गाडी
देव अजब गारुडी, देव अजब गारुडी
देव अजब गारुडी, हो, देव अजब गारुडी



Credits
Writer(s): Basant Pawar, Bahinabai Chaudhary, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link