Uma Mhane Yadyni Maze

मानभंग हाचि झाला मंडपी आहेर
मानभंग हाचि झाला मंडपी आहेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

माहेरीच्या सोहळ्यात (माहेरीच्या सोहळ्यात)
नाहि निमंत्रिले जामात (नाहि निमंत्रिले जामात)
चहू दिशी चालू होते संपदेचे थेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

लक्ष्मीचे जमले दास (लक्ष्मीचे जमले दास)
पुसे कोण वैराग्यास (पुसे कोण वैराग्यास)
लेक पाठीचीही झाली कोपऱ्यात केर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

आईबाप, बंधुबहिणी (आईबाप, बंधुबहिणी)
दारिद्र्यात नसते कोणी (दारिद्र्यात नसते कोणी)
दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

दक्षसुता जळली मेली (दक्षसुता जळली मेली)
नवे रूप आता ल्याली (नवे रूप आता ल्याली)
पित्याघरी झाला ऐसा दिव्य पाहुणेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

परत सासुर्याशी जाता (परत सासुर्याशी जाता)
तोंड कसे दावू नाथा? (तोंड कसे दावू नाथा?)
बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

प्राणनाथ करिती वास (प्राणनाथ करिती वास)
स्वर्गतुल्य तो कैलास (स्वर्गतुल्य तो कैलास)
नाचतात सिद्धी तेथे धरूनिया फेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

असो स्मशानी की रानी (असो स्मशानी की रानी)
पतीगृही पत्नी राणी (पतीगृही पत्नी राणी)
महावस्त्र तेथे होते सतीचे जुनेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर



Credits
Writer(s): Vasant Pawar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link