Yetes Ka Ga Pori

येतेस का गं पोरी? चल फिराला जाऊ
तू येतेस का गं पोरी? चल फिराला जाऊ
जोडीनं जाऊ, cinema पाहू
अन हॉटेलात दोघं बी राहू

आरं, बाजूला हो रं पोरा, नको लाडात येऊ
आरं, बाजूला हो रं पोरा, नको लाडात येऊ
पाठी नको येऊ, असा येडा नको होऊ
माझ्या वाटंला नको रं जाऊ

बोल, येतेस का गं पोरी? चल फिराला जाऊ
आरं, बाजूला हो रं पोरा, नको लाडात येऊ, अहा

तुझ्या गळ्यात बांधीन मणी
ठेव तू ध्यानी गं, माझे राणी (चूप कर)
तुझ्या गळ्यात बांधीन मणी
ठेव तू ध्यानी गं, माझे राणी

तुझ्या नादाला लागायला
ये पोरा, आहे का रं मी अडाणी?

अगं, आज ना उद्या व्हशीन तू माझी
मग आताच का नाही जाऊ? (फूट)
बाजूला हो रं पोरा, नको लाडात येऊ
जरा येतेस का गं पोरी? चल फिराला जाऊ
जा-जा, तूच जा

मी लक्ष्मण, तू उर्मिला
गं ये जोडीला, झालं काय लाजाया? (आता)
मी लक्ष्मण, तू उर्मिला
गं ये जोडीला, झालं काय लाजाया?

लाख मोलाची नाजूक काया
ही जाईल वाया, नको येऊ खेटाया

अगं, हेरलिया तुला, सारं ठाऊक मला
चल दोघे बी गंगेत न्हाऊ (हट)
बाजूला हो रं पोरा, नको लाडात येऊ
चल येतेस का गं पोरी? जरा फिराला जाऊ
"न्हाई" म्हटलं ना

मला तुझी अन तुला माझी
गरज आहे गं, सखे-साजणी, हे-हे-हे-हा
मला तुझी अन तुला माझी
गरज आहे गं, सखे-साजणी (कशी?)

एका हातानं वाजे न टाळी
न चाले गाडी एका चाकानी

खरं आहे तुझं, चुकलंया माझं
आता झालं, गेलं विसरून जाऊ
मग येतेस ना गं पोरी? चल फिराला जाऊ (हा-हा)
आता येतेस ना गं पोरी? चल फिराला जाऊ

जोडीनं जाऊ, cinema पाहू
अन हॉटेलात दोघं बी राहू



Credits
Writer(s): Raam Laxman, Anant Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link