Patang Mi Tu Dora

ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला

पतंग मी, तू दोरा ओढून घे रे
पतंग मी, तू दोरा ओढून घे
गं हळूहळू ये, ये, ये
हातात हात दे, दे, दे

मिठीत माझ्या ये, ये
पतंग मी, तू दोरा ओढून घे

आकाशी तू अन मी
उंच भरारी घेऊया
वर ढगावरी प्रेमाचे
चिन्ह आपले कोरूया (असं)

पावसाच्या थेंबातून
प्रेम आपले ओतुया
ह्या धरतीवर, प्रियतमे
बाग आपली फुलवूया

फुल मी, तू भुंगा धावून ये
गं हळूहळू ये, ये, ये
हातात हात दे, दे, दे
मिठीत माझ्या ये, ये
पतंग मी, तू दोरा ओढून घे

मदनाचा पुतळा तू
मदनाला ही लाजवीशी
मला राहावं ना तुझ्याविना
वयानं गाठलंय बावीशी

हळदीहून पिवळी तू
वाटे हवी-हवीशी
पण दूर अशी राहू नको
भिडू दे अंग अंगाशी

आग हृदयाची विझवून दे
गं हळूहळू ये, ये, ये
हातात हात दे, दे, दे
मिठीत माझ्या ये, ये
पतंग मी, तू दोरा ओढून घे

कपाळीचं कुंकू तू
दपेन माझ्या जीवनात
देहाचं चंदन हे
झिजविन तुझ्याच सेवेत

भाग्याची तुळस तू
फुलशील माझ्या अंगणात
गाठूया पैलतीर संसाराच्या नावेत

साथ प्रेमाची सोडू नको
गं हळूहळू ये, ये, ये
हातात हात दे, दे



Credits
Writer(s): Raam Laxman, Anant Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link